रत्नागिरी : गेली दहा वर्षे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना विनायक राऊत यांनी प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला. एकही नवा रोजगार निर्माण केला नाही. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मात्र तरूणांचे भविष्य घडविण्याचे व्हिजन आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. येथील युवा वर्गाला याठिकाणीच चांगले शिक्षण व रोजगार प्राप्त होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करायला तयार आहोत. यासाठी मोदी सरकार सत्तेवर येण्यासाठी कमळ निशाणीसमोरील बटन दाबून मला मत द्या, असे आवाहन भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीतील युवकांना केले.
महायुतीच्या युवकांचा मेळावा रत्नागिरी शहरात सोमवारी सकाळी झाला. यावेळी नव मतदार तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, शिवसेना शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, स्मितल पावसकर, आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
केवळ दुसऱ्यावर टीका करणे एवढच काम उद्धव ठाकरे करतात. त्यांनी तुम्हाला इथंच रोजगार देणारे प्रकल्प पळवून लावले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंना ३८ कोळसा कंपनींचे मालक भेटले. जैतापूर प्रकल्प सुरू झाल्यास कोळसा उत्पादक अडचणीत येतील, असे या मालकांनी सांगितले. अखेर तडजोड झाली आणि प्रकल्पाला विरोध केला. ५ कोटी अॅडव्हान्स म्हणून घेतले. प्रदूषणाचे कारण देत यांनी नाणार प्रकल्पालाही नको सांगितलं. मग स्वतः तरी एखादा कारखाना आणायचा. चिपी विमानतळ करताना देखील १५ माणसे घेऊन येथील विद्यमान खासदारांनी विरोध केला. आणि तेच खासदार विमानतळाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताला उभे होते. हा खासदार तोडबहाद्दर आहे, असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.
सी वर्ल्ड प्रकल्पाला देखील यांनी विरोध केला. रेडी पोर्ट मंजूर केला, दर महिन्याला खासदारांचा मुलगा तोडपाणी करायला जातो. रत्नागिरीचा महामार्ग याच खासदाराने थांबवला. ठेकेदाराकडे २० कोटी मागितले म्हणून काम थांबले. पण सिंधुदुर्गमध्ये चार वर्षांपूर्वीच महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचे राणे म्हणाले. या माणसाने विकासाची कामे थांबवून आमच्या तरुण तरुणींना विकासापासून वंचित ठेवले असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, युवक, युवकांनी प्रत्येकी १०० जणांना मतदानासाठी आणावे व कमळ निशाणी असलेले बटण दाबावे. आपण महायुतीचे आहोत व पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा निवडून आणायचे आहे, राणेंना विजयी करायचे आहे ही गोष्ट मनावर घ्या. त्यासाठी मिशन राबवा. युवकांच्या मतावर सर्व काही अवलंबून आहे. युवकांना तिकीट मिळत नाही, असं समजण्याचे कारण नाही. लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद असेल तर युवकही पुढे येतात. महायुतीच्या युवक-युवतींनी आक्रमक व्हावे. म्हणजे मारामारी करायची नव्हे तर आपले प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून ते सोडवण्यासाठी, रोजगारासाठी, चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…