Heatwave precautions : उन्हाचा पारा वाढला! आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना

Share

घराबाहेर पडताना काय काळजी घ्याल?

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा (Heatwave) प्रचंड वाढला असून उष्माघातामुळे (Heatstroke) माणसे दगावल्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबईसारख्या ठिकाणीही तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. घराबाहेर पडताच उन्हाच्या झळा बसू लागतात. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather department) वर्तवली आहे. यावर खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने (Health Department) काही विशेष सूचना जारी केल्या आहेत. वाढत्या उन्हात कशी काळजी घ्यावी व काय करु नये, याबाबत आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क केलं आहे.

‘हे’ करा (Dos For Heat wave)

  • जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा. ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
  • प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
  • ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) किंवा लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेय प्यावे.
  • टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
  • पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
  • तुमचे डोके झाकून ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपीचा वापर करा.
  • उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
  • हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.
  • दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे. थंड हवा येण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.
  • जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी. दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.
  • लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, ज्यांना मानसिक आजारपण असेल अशा व्यक्ती आणि विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.
  • थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा, जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
  • एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
  • तुमचे घर थंड ठेवा; पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा.
  • दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा.
  • शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा.
  • पाण्यात पाय बुडवल्याने शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.

‘हे’ करू नका (Don’ts for Heat wave)

  • उन्हात विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळा.
  • दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा.
  • अनवाणी बाहेर जाऊ नका.
  • अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा.
  • हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
  • अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा.
  • उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
  • उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

2 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago