Vande Bharat Metro: आता येत आहे वंदे भारत मेट्रो, रेल्वेने ट्रायल रनची तयारी केली सुरू

मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस या रेल्वेसेवा सुरू केल्या. सोबतच रेल्वे स्थानकेही मॉडर्न होण्याच्या मार्गावर आहे.


आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनचे(vande bharat train) मेट्रो व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, याला वंदे भारत मेट्रो असे नाव दिले गेले आहे. ही ट्रेन लहान प्रवासासाठी फायदेशीर असेल. भारतीय रेल्वे वंदे भारत मेट्रोच्या ट्रायल रनला जुलैपासून सुरूवात केली जाणार आहे.



वंदे भारत मेट्रोमध्ये असणार ४ ते १६ कोच


रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्राथमिकता वंदे भारत मेट्रो आहे. यात १२ कोच असतील. या ट्रेनला वेगाने चालण्याच्या हिशेबाने डिझाईन करण्यात आले आहे. यात चार कोच, आठ कोच आण १६ कोच असलेले मॉडेलही चालवले जाऊ शकतील. अधिक गर्दी असलेल्या मार्गावर १६ कोचची वंदे भारत मेट्रो ट्रेन चालवली जाईल. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन फायदेशीर आहे.



१०० ते २५० किमी दूरपर्यंत चालणार


बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार भारतीय रेल्वेच्या मते ही वंदे मेट्रो ट्रेन १०० ते २५० किमी दूरपर्यंत चालवली जाईल. पहिल्या टप्प्यात १२४ शहरांना वंदे मेट्रो एकमेकांना जोडेल. यात काही मार्ग निश्चित करण्यात आले आहे. यात लखनऊ-कानपूर, आगरा-मथुरा आणि तिरूपती-चेन्नई यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने