Sunday, July 6, 2025

Crime : नात्याला काळीमा! काकानेच केला पुतणीवर अत्याचार

Crime : नात्याला काळीमा! काकानेच केला पुतणीवर अत्याचार

धुळे : काका आणि पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात घडल्याची समोर आली आहे. कुटुंबातील या नराधम काकानेच त्याच्या पुतणीवर अत्याचार केला असून पुतणी गरोदर राहिल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथे नागझरी गावात राहणारी अल्पवयीन पीडित मुलगी व अत्याचार करणारा तरुण हे नात्याने चुलत काका पुतणी आहेत. अत्याचार करणारा चुलत काका हा पीडित मुलीच्या घराजवळच राहत होता. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याच महिन्यात पीडित मुलगी ही गुजरात येथे कुटुंबासोबत ऊसतोडणीच्या कामासाठी निघून गेली. मात्र तेथे तीन ते चार महिन्यांनंतर मुलीचे पोट वाढल्याचे तिच्या आजीच्या लक्षात आले. आजीने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार उघडकीस आला आहे.


दरम्यान, याप्रकरणी चुलत काकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस नराधमाची कसून चौकशी करत आहे. परंतु पीडित मुलीला ऊसतोड मुकादमने घरी न सोडल्यामुळे या मुलीला अखेर बाळास जन्म द्यावा लागला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा