UP News : परिक्षेत लिहिले फक्त 'जय श्री राम' अन् विद्यार्थी झाले ५६ टक्क्यांनी पास!

  67

प्राध्यापकांवर होणार कठोर कारवाई


लखनऊ : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या टीका-टिप्पणी हा चर्चेचा विषय ठरतो. त्याशिवाय देशभरात होणाऱ्या बाकी घडामोडीदेखील चर्चेचा चांगलाच विषय ठरत आहे. अशातच उत्तर प्रदेशात घडलेला एक अजब प्रकार समोर उघडकीस येत आहे. उत्तर प्रदेशामधील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत फक्त 'जय श्री राम' लिहले असून ते चक्क ५६ टक्क्यांनी पास झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत विद्यापीठाकडून संबंधित प्राध्यापकांची कसून चौकशी करत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितले जातं.



नेमकं प्रकार काय?


एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हा अजब प्रकार उत्तर प्रदेशमधील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात घडला आहे. विद्यापीठाच्याच एका माजी विद्यार्थ्याने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या विद्यापीठात फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या परीक्षेत पेपरमध्ये फक्त ‘जय श्री राम, आम्ही पास होऊ देत’ आणि रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या अशा काही भारतीय क्रिकेटपटूंची नावं लिहिली.


परीक्षेचे निकाल आल्यानंतर हे विद्यार्थी तब्बल ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याची बाब समोर आली. दिव्यांशू सिंह नावाच्या एका विद्यार्थ्यानं परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळे एकूण १८ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाव्यात व त्यांची पुनर्तपासणी करण्यासाठी आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल केला. या विद्यार्थ्याला अर्जाच्या उत्तरादाखल मिळालेल्या उत्तर पत्रिकांपैकी चार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये हा सगळा मजकूर असल्याचं दिसून आलं.



प्राध्यापकांविरोधात पैसे खाल्ल्याचे आरोप


दरम्यान, विद्यापीठातील प्राध्यापक पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत असल्याची तक्रार याआधीही समोर आली होती. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्याने उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनाही पत्र लिहून तक्रार केली होती. त्यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर यासंदर्भातला अहवाल सादर झाला असून संबंधित प्राध्यापक दोषी आढळून आले आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्राध्यापकांवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये