हा देश शरियतवर नाही, युसीसीवर चालेल

गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल


गुना : ‘पंतप्रधान मोदींनी या देशाच्या विकासात एससी, एसटी आणि ओबीसींना प्राधान्य दिले. दुसरीकडे या देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. हा देश समान नागरी कायद्यावर (युसीसी) चालेल. हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये यूसीसी आणले, आता देशभरात लागू करू. काँग्रेसला देशात मुस्लिम पर्सनल लॉ आणायचा आहे. पण, हा देश शरियतवर नाही, युसीसीवर चालेल, असे प्रतिपादन करत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.


लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी गुना लोकसभा मतदारसंघात सभा घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.


‘काँग्रेस ओबीसीविरोधी पक्ष आहे. अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील लोकांना केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण दिले जात नव्हते. काँग्रेसने ७० वर्षे आपल्या मुलाप्रमाणे कलम ३७० वाढवले, तर पंतप्रधान मोदींनी हे कलम ३७० रद्द केले, असे अमित शहा म्हणाले.


‘पंतप्रधान मोदींनी या देशातून दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला. आता ही निवडणूक देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींनी देशात १ कोटी लखपती दीदी निर्माण केल्या, आता ही निवडणूक ३ कोटी मातांना लखपती दीदी बनवण्याची निवडणूक आहे. मोदींनी १० वर्षात देशातील कोट्यवधी गरीब जनतेसाठी खूप कामे केली आहे’, असेही शहा यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक

गॅस सिलिंडरच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ

नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक

मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी