कोकण किनारपट्टीवरील दर्याचा राजा कायम संकटाच्या खाईत...संपूर्ण किनारपट्टीवर मासळीचा दुष्काळ....

अवैध एलईडी-पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात...पर्यटकांच्या खवय्येगिरीवर विरजण...


मुरुड(प्रतिनिधी संतोष रांजणकर)- संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मासळीचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. या दुष्काळामुळे दर्याचा राजा संकटाच्या खाईत जात आहे. अवैध एल ई डी मासेमारी पारंपरिक मच्छीमारांच्या जीवावर कर्दनकाळ ठरते आहे. यामुळे मुरुड जंजिरा फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या मासळी खवय्येगिरीवर विरजण पडले आहे.


वारंवार होणारे हवामानातील बदल, समुद्रातील वाढते जल प्रदुषण, समुद्रातील वाढते मानवी हस्तक्षेप, अवैध एलईडी-पर्ससीन मासेमारी दिवसेंदिवस समुद्रातील माशांचे उत्पादन घटत चालले आहे. राज्याच्या ७२० कि.मी. लांबीच्या समुद्र किनाऱपट्टीवर असलेल्या दर्याचा राजा गेली कित्येक वर्षे मासळी दुष्काळाच्या कचाट्यात सापडत चालला आहे.


या परिस्थितीत आज दर्याचा राजा संकटाच्या खाईत लोटला आहे. तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत. त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत. तर काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळेही माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहेत.


अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये झीरो ऑक्सिजन झोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा भागांतून काही प्रजातींचे मासे इतरत्र स्थलांतरित होत आहेत. घोळ, जिताडा, शेवंड, बोंबील, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे याचबरोबर इतर अनेक प्रजातींचे समुद्रातील अस्तित्व काही वर्षांपासून कमी झाले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी मासेमारीच्या अतिरेकाचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे.

Comments
Add Comment

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले