Deepak kesarkar : उत्कृष्ट खोटे कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे

दीपक केसरकर यांचा खोचक टोला


४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे असतील : उदय सामंत


मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता पालकमंत्री व शिवसेना नेते दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उत्कृष्ट खोटे कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत', असा खोचक टोला त्यांनी लगावला. याउलट केंद्रीय मंत्री नारायण राणे (


) मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, खोटे उत्कृष्ट कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत. खोटे बोलणाऱ्यांमध्ये भारतात नंबर काढला तर हे राजपुत्र एक नंबरला जातील, याची मला खात्री आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा डाव निश्चितच करण्यात आलेला होता, असेही दीपक केसरकर म्हणाले.



वैभव नाईकांनाही लगावला टोला


पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी वैभव नाईक यांच्यावरही टीका केली. प्रत्येक गोष्टीत कुत्सित बोलून विकास होत नाही. जर्मनीबाबत लेखी करार झालेला आहे. वैभवजींचा स्थानिक पातळीवर गावागावात काम करण्यावर भर असतो. त्यामुळे नोकऱ्या, मोठ्या इंडस्ट्री यांबाबत ते फारशी माहिती घेत नसतील, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.



नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील


केसरकर म्हणाले, महाराष्ट्राचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा राहिलेला आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे यांनी काम केलेले आहे. चिन्ह कुठलेही असले तरी महायुती म्हणून मतदान होत असते. त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे : उदय सामंत


दरम्यान, मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीदेखील कोकणात नारायण राणे निवडून येतील, अशी खात्री व्यक्त केली आहे. ते म्हणाले, नारायण राणे यांनी कोकणाला न्याय दिलेला आहे. ४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे असतील हा शब्द देतो. पुढच्या वर्षी रत्नागिरी विमानतळावरून टेक ऑफ होईल. स्वतःची निवडणूक आहे, असे समजून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करत, उद्योग परराज्यात गेले हे पाप ठाकरे गट आणि त्यांच्या प्रमुखांचे आहे, अशी टीका त्यांनी केली. नरेंद्र मोदी विरुद्ध कमकुवत राहुल गांधी अशी ही लढाई आहे. सर्वच्या सर्व जागा या महायुतीच्या निवडून येतील ही खात्री आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि