Kirit Somaiya : संजय राऊत को हिसाब तो देना पडेगा!

  64

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा राऊतांना सणसणीत टोला


मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ येत असताना ठाकरे गट (Thackeray Group) मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. कोविड काळात किंवा त्याआधी केलेले घोटाळे आता बाहेर येत असून त्यांचा मोठा फटका ठाकरे गटाला बसत आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर दाखल असलेल्या घोटाळ्यांवरही ईडीची वेगाने कारवाई सुरु आहे. राऊतांच्या गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somiaya) यांनी संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे. 'संजय राऊतांना सगळ्याचा हिशेब द्यावा लागेल', असं ते म्हणाले आहेत.


किरीट सोमय्या म्हणाले, सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी (२४ एप्रिल) ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांचे साथीदार प्रवीण राऊत यांची गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ७४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. प्रवीण राऊतने पीएमसी बँकेचे ९५ कोटी रुपये पत्राचाळ एसआरएद्वारे स्वतःच्या बँक खात्यात वळवले. त्यातले कोट्यवधी रुपये संजय राऊतांच्या खात्यात गेले. तसेच त्यांनी अलिबागमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे.


या लोकांनी गरीब झोपडपट्टीवासियांना एसआरएअंतर्गत (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) पक्की घरं देण्याच्या प्रकल्पात घोटाळा केला आहे. त्यांनी गरीब झोपडपट्टीवासियांची फसवणूक केली आहे. त्यामुळे राऊतांना याप्रकरणी हिशेब द्यावाच लागेल, असं सोमय्या म्हणाले आहेत.


ईडीने कारवाई केलेल्या मालमत्तेत संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत आणि त्यांच्या जवळच्या साथीदारांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे परिसरातील जमिनींचा समावेश आहे.



नेमकं प्रकरण काय?


म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले होते. या कंपनीने २००६ मध्ये पत्राचाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. विकासकाने ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम १२० (ब), ४०९, ४२० अंतर्गत मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहे.


आर्थिक गुन्हे शाखेतील प्रकरणाच्या आधारवर ईडीने तपासाला सुरूवात केली. ईडीने गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत आणखी माहिती घेतली असता ही रक्कम पुढे प्रवीण राऊत याने त्याच्या जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्याच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. त्यानंतर हा तपास संजय राऊत यांची पत्नी व त्यानंतर संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला.

Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम