Salman Khan house firing : सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या देण्यात आल्या होत्या सूचना!

  338

मुंबई पोलिसांनी न्यायलयामध्ये केले गौप्यस्फोट


मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी (Firing) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वेगाने तपास करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गोळीबाराचा संबंध लॉरेन्स बिश्नोईशी आहे. दरम्यान, आज दोन आरोपींना न्यायलयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी आरोपींच्या जबाबावरुन मुंबई पोलिसांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये सलमान खानच्या घरावर आरोपींना गोळ्यांचा वर्षाव करण्याची सूचना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी ५ गोळ्या फायर केल्या आणि १७ राऊंड पोलिसांनी जप्त केले. गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनेकदा कपडेही बदलले. जेणेकरून पोलीस त्यांना कपड्यावरून ओळखू नयेत. त्याशिवाय, हे दोन्ही आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. यासाठी आरोपींचा एक मोबाइल वायफायने जोडलेला होता.


सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना राज्याच्या बाहेरूनही मदत पुरवण्यात आली. यामध्ये राजस्थान, बिहार आणि हरियाणातून आरोपींना मदत पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींना मदत पुरवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.



आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी


सलमान गोळीबार प्रकरणात आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.