Gold Rate : ग्राहकांना सुखद धक्का! सोनं-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांना दिलासा

जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर


मुंबई : सध्या अनेक ठिकाणी लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच सोने व चांदीच्या वाढत्या दरामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसला होता. मात्र आता सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. गगनाला भिडत असणाऱ्या सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण होत असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. जाणून घ्या सध्याच्या सोन्या-चांदीच्या किंमती काय आहेत.


गेल्या दोन महिन्यांच्या विक्रमी दरवाढीनंतर मागील तीन दिवसांत सोन्या आणि चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट दिसून आली आहे. सततच्या वाढीमुळे सोन्याची किंमत ७५,००० रुपयांवर झेप घेईल असे दिसत होते. पण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर ७०,९८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहेत. तर दिवसभरात या दरांमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, चांदीचा दर ८०,८२६ रुपये प्रति किलोवर घसरला आहे. मात्र सप्टेंबरपर्यंत चांदीचे दर वाढून ८३,८३९ रुपये प्रति किलोवर येण्याची शक्यता वर्तवली आहे.



सराफा बाजारातील सोन्याचा दर


दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर ७२,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरात १४५० रुपयांनी घट झाली आहे. पुढील काही दिवस सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. सोनं ७०,००० रुपयांवर येण्याची शक्यता आहे.


दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६३०० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१६०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५५८० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.



आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची किंमत


भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर स्वस्त होत असताना जागतिक बाजारात दोन्ही धातूच्या किंमती वधारल्या आहेत. बुधवारी सोन्याच्या जागतिक किंमतीतही घसरण दिसून आली. कॉमेक्सवर सोन्याचे जागतिक फ्युचर्स ०.१८% किंवा ४.१० डॉलरने घसरून २,३३८ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते, तर सोन्याची स्पॉट किंमत प्रति औंस २,३२५.१९ डॉलरवर तेजीसह ट्रेंड करत आहेत. त्याचवेळी, बुधवारी चांदीच्या जागतिक किमतीत वाढ नोंदवली गेली आणि कॉमेक्सवर चांदीचे फ्युचर्स ०.२६% किंवा ०.०७ डॉलर वाढीसह २७.७१ डॉलर प्रति औंसवर तर चांदीची जागतिक स्पॉट किंमत २७.४० डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत