Tuesday, July 16, 2024
Homeमहत्वाची बातमीNarayan Rane : कोकणात येऊन बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून...

Narayan Rane : कोकणात येऊन बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

रत्नागिरी : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी प्रचारासाठी सभांचा धडाका लावला आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. ‘सिंधुदुर्ग दौऱ्यात आल्यानंतर अशा प्रकारचे शब्द बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी दाखवतो’, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

नारायण राणे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पक्ष काही वर्षात संपवला. ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कोणत्या भाषेत बोलत आहेत. पण आता मी खासदारकी लढवत आहे. ते इकडे कोकणात येतील, या आणि असे शब्द सिंधुदुर्गमध्ये बोलून दाखवा. मग परत जायचा रस्ता कुठून आहे ते आम्ही दाखवतो. हे चालणार नाही”, असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणजे लाज सोडलेला कोडगा व अक्कलशून्य माणूस आहे. माननीय अमितजी शहा मातोश्रीवर जाऊन ५ वर्षे झाली तरीही त्यावेळेच्या घटनेबद्दल लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत. अमितजी शहा यांनी उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव मान्य केलाच नव्हता. त्यांनी अनेक वेळा भाजपाने शिवसेनेला अडीच वर्षांची मान्यता दिलीच नव्हती हा खुलासा केला आहे.

मुख्यमंत्रीपदी असूनही महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीच करू न शकलेला असा अपयशी आणि महाराष्ट्राला मागे नेणारा हा मुख्यमंत्री होता. तोच तोच चुकांचा जुना इतिहास सांगून अभद्र अपशब्द वापरणारा लाजलज्जा सोडलेला हा माणूस कोडगा आहे. सत्ता गेल्याने व डोळ्यासमोरून ४० आमदार शिवसेना सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने व भविष्याच्या चिंतेने वैफल्यग्रस्त झाला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बदल कोणताही अपशब्द उच्चारल्यास तुम्हाला कोणीही चांगले म्हणणारच नाही. जनतेसाठी करण्यासारखे काही नसल्याने वेडसरपणे ते टीका करीत आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरविला. या करंट्या माणसाने साहेबांच्या नंतर काही वर्षांतच शिवसेना पक्ष संपविला”, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -