मुंबई : गेल्या महिनाभरापासून मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून येत्या काही दिवसांत हे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याच वेळी घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. अशातच अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका वीज ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाच्या चटक्यांसोबत वाढत्या वीज बिलाचा शॉक बसणार आहे.
अदानी कंपनीने गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील ३१८ कोटी ३८ लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला होता. याबाबत आयोगाने सोमवारी मान्यता दिली. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते २४ या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाईल. या वाढत्या वीजेचा फटका तब्बल ३० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. तर वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाईल.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीजदरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. पण महाराष्ट्राचा विचार केला तर वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…