Loksabha Election : लोकसभेसाठी भाजपची १४वी यादी जाहीर; 'या' खासदाराचा पत्ता कट!

लडाख : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर '४०० पार'चं मिशन यशस्वी करण्यासाठी भाजप कंबर कसून प्रयत्न करत आहे. भाजपने आता लोकसभेसाठी उमेदवारांची १४वी यादी जाहीर केली आहे. यात प्रसिद्ध खासदाराचा पत्ता कट झाला असून दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. भाजपने लडाख (Ladakh) मतदारसंघातून विद्यमान खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) यांच्या जागी ताशी ग्याल्सन (Tashi Gyalson) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.


लडाखचे विद्यमान भाजप खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी ६ ऑगस्ट २०१९ रोजी लोकसभेत कलम ३७० वरील चर्चेदरम्यान जोरदार भाषण केले होते. त्यांचे भाषण इतके व्हायरल झाले की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करुन त्यांचे कौतुक केले होते. नामग्याल भाजपच्या काही प्रसिद्ध खासदारांपैकी एक होते. दरम्यान, लडाखमध्ये स्थानिक विरोधामुळे भाजपने त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.





कोण आहेत ताशी ग्याल्सन?


ताशी ग्याल्सन हे प्रदीर्घ काळापासून भाजपशी संबंधित आहेत. आता ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. सध्या त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद असून, ते हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर आहेत. याशिवाय ताशी व्यवसायाने वकील आहेत. येथे त्यांची काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवांग रिग्जिन जोरा यांच्याशी स्पर्धा आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे