क्लिष्ट समस्या सोडवू शकालमेष : हा आठवडा आपल्याला अनुकूल स्वरूपाचा जाईल. आपल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आत्मविश्वासात वृद्धी करणारा ठरेल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हातात घ्याल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन योजना तसेच नव्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. त्याचा व्यवसायावर पोषक परिणाम होईल. भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद टाळा. समज- गैरसमज नको. व्यवसायाचे हित लक्षात घ्या. नोकरीच्या ठिकाणी काही क्लिष्ट समस्या आपण सोडवू शकाल. वरिष्ठांच्या बरोबर असलेले संबंध सुधारतील. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. त्याचा भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत. | |
जीवनमान बदलू शकते | |
मदत मिळेल | |
आशीर्वाद लाभतीलकर्क : दीर्घकाळ रखडलेले अथवा प्रलंबित राहिलेले जमिनीचे तसेच स्थायी मालमत्तेचे व्यवहार गतिशील होऊन त्याचा पूर्णत्वाकडे प्रवास होईल. समाजातील काही मान्यवर व सन्माननीय व्यक्तींकडून आपल्याला मदत मिळू शकते. महत्त्वाच्या व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभेल. मित्रमंडळींच्या परिवारातून मदत मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. मात्र प्रामाणिकपणे आपल्याला प्रयत्न करायला हवेत. मन शांत ठेवून दृढ निश्चयाने लहान-मोठे निर्णय घ्या. आर्थिक लाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. परिवारातून मदत मिळेल. | |
अपेक्षित सहकार्य मिळत राहील | |
सतर्क राहणे आवश्यककन्या : सध्याचा कालावधी अनुकूल असला तरी काही बाबतीत आपल्याला सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. उलाढाल वाढेल; परंतु जबाबदाऱ्या व खर्चही त्याच प्रमाणात वाढल्याने गोंधळून जाण्याची शक्यता. व्यवसायिक समस्या शांतपणे विचार करून मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात भागीदारामुळे प्रश्न संपुष्टात येतील. आर्थिक मदत मिळू शकते. येणाऱ्या कालावधीमध्ये यशाचे प्रमाण वाढणार आहे. | |
नाट्यमय प्रसंग घडू शकताततूळ : भाग्याची साथ मिळाल्यामुळे रखडलेली किंवा अर्धवट अवस्थेतील असलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. व्यवसाय-धंद्यात अपुरे राहिलेले प्रोजेक्ट आता पूर्ण होतील. पण प्रयत्न मात्र त्यादृष्टीने केल्यास त्यात यश मिळेल. आर्थिक मदत मिळेल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. प्रयत्नांमध्ये सातत्य राहिल्यास आपली कामे आपण पूर्ण करू शकाल. वेळेचा अपव्यय व आळस टाळणे हितकारक ठरेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. दूरचा प्रवास घडू शकतो. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अपेक्षित कामे मार्गी लावू शकाल. | |
नवे नियोजन करालवृश्चिक : आपण घेतलेले निर्णय अचूक ठरल्याने पुढील कामे करण्यात उत्साह राहील. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हाती घ्यावीशी वाटेल. तसेच त्या दृष्टिकोनातून नवे नियोजनही कराल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून काही नवीन बदल करण्याचे ठरवाल. हे नवीन प्रकारचे बदल आपल्या व्यवसायासाठी पोषक ठरतील. बदलत्या परिस्थितीनुसार बदल करावे लागतील. व्यवसाय-धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार कराल. आत्मविश्वासाने जरी निर्णय घेतले तरी वस्तुस्थितीची जाण ठेवणे हितकारक ठरेल. | |
भावनांवर नियंत्रण आवश्यकधनु : आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल. वरिष्ठांकडून कौतुकास पात्र ठराल. एखादी महत्त्वाची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. भावनांवर नियंत्रण राहील.आर्थिक परिस्थिती उंचावेल. जे जातक नोकरीच्या शोधात होते अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येऊन नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. रोजगारांना रोजगार मिळू शकतो. | |
खर्चात वाढ होऊ शकते | |
कार्ये मार्गी लागतील | |
कार्यपूर्ततेचा आनंद मिळेलमीन : आपल्या आजूबाजूस अनुकूलतेचे प्रमाण वाढलेले आपल्याला अनुभवता येईल. थोड्याच प्रयत्नांनी दैनंदिन कामे होत असलेली बघून आपला आत्मविश्वास बळावेल. नवीन कामे हाती घ्याल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. नवीन नियोजन करू शकाल. एखादे महत्त्वाचे काम बरेच दिवस होण्याची वाट आपण बघत होता ते काम झाल्यामुळे इच्छापूर्तीचा आनंद घेऊ शकाल. आपल्या प्रयत्नांना यश मिळून अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील. काही बाबतीत मात्र अधिक मेहनतीने यश खेचून आणावे लागेल. प्रयत्नात कमी पडून देऊ नका. कुटुंबातून जीवनसाथीची साथ आपल्याला मिळेल. नोकरीमध्ये सोपविलेल्या कामामध्ये यश मिळेल. |
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…