Ram Satpute : 'मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत फेटा बांधणार नाही'

भाजपा आमदार राम सातपुतेंचा संकल्प


सोलापूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजपा आमदार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचारसभांचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. रविवारच्या भगवान महावीर जयंती निमित्त सोलापुरात जैन बांधवांकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम सातपुते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे विधान केले आहे.


'जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही,' असा संकल्प सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना सातपुते यांनी आपली भावना व्यक्त केली.



राम सातपुते यांचा काँग्रेसवर आरोप


"मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांसमोर मी संकल्प केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अथवा मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी फेटा घालणार आहे," असे त्यांनी यावेळी नमूद केले.


"हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली. या घटनेचा मी निषेध करतो. तसेच मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत," असा आरोपही यावेळी राम सातपुतेंनी केला.

Comments
Add Comment

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण