मुरादाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडलं. आता २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यादरम्यान, भाजपाच्या एका उमेदवाराचं मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. भाजपाचे माजी खासदार आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह (७२) यांचे काल दु:खद निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंवर सर्वेश सिंह यांच्या गळ्याला त्रास होत होता व त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. १९ एप्रिल रोजी ते तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेले होते मात्र त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने धक्का बसला. भाजपासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. तसेच ‘भाजपाचे नेते आणि मुरादाबादमधील भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत माजी खासदार कुंवर सिंह यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला. कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन फक्त मुरादाबाद नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजपासाठी मोठं नुकसान असल्याचं’ भूपेंद्र सिंह चौधरी यांनी म्हटले.
सिंह यांच्या मृत्यूची बातमी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून याबाबत निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. मतमोजणी ठरलेल्या दिवशीच केली जाणार. कुंवर सर्वेश सिंह हे विजयी ठरले तर पोटनिवडणूक घेतली जाईल व पराभव झाल्यास काही फरक पडणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…