Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री!

नालायक लोकांच्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे टॉपला असतील


चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेले दावे आणि टीकांमुळे भाजप नेते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 'नालायक' असा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी पातळी सोडून वक्तव्य केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. सोबतच आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) हल्लाबोल केला आहे.


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जगातील कोणत्याही एजन्सीमार्फत १४ कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं तरी या महाराष्ट्रातील लायक व्यक्तींच्या यादीत टॉप क्रमांक एकला माननीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव असेल. कारण मुख्यमंत्री आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जनतेच्या मनामनांत आहे. तसंच महाराष्ट्रातील सर्वात नालायक लोकांचं जर दुसरं सर्वेक्षण केलं तर त्यात सर्वात टॉपला उद्धव ठाकरे दिसतील, अशी जहरी टीका बावनकुळे यांनी केली.


पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कार्यकाळात काय केलं ते माहित आहे. अडीच वर्षे खिशात पेन नसलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षे विधानमंडळात दोनदा आलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षांत दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, असा त्यांचा कार्यकाळ या १४ कोटी जनेतेने पाहिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी आणि इतिहास पाहिला तर पहिला निष्क्रीय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. ते मनोरुग्णासारखे, मानसिक स्थिती ढासळल्यासारखे वागतायत. त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, असं मला वाटतं, असं बावनकुळे म्हणाले.



उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर


देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं ट्रेनिंग देऊन मग राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणार होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना कधीच कुणी मुख्यमंत्री काय मंत्रीही केलं नसतं. त्याची काय लायकी आहे? कुठली पंचायत ते पार्लामेंट त्यांनी काम केलं आहे? कधी रेशनकार्ड, आधारकार्ड काढलं आहे? चुकून ते एका मतदारसंघात निवडून आले आहेत, काही वेळेस असं होऊ शकतं. पण त्यांची लायकी आहे का? कोण असा शब्द देईल त्यांना?, असं बावनकुळे म्हणाले.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम