Raj Thackeray : महायुतीच्या १७ मे च्या सभेला राज ठाकरे उपस्थित रहाणार

राहुल शेवाळे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर पहिल्यांदाच महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता झालेल्या भेटी दरम्यान आमदार सदा सरवणकर, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी आमदार तुकाराम काते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीची रणनीती, १७ मे रोजीची महायुतीची सभा याबाबत राज ठाकरे यांनी सूचना दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी केली.



संवेदनशील नेते राज ठाकरे


या सदिच्छा भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांना दिलेल्या सल्ल्यांवरून त्यांची संवेदनशीलता दिसून आली. सध्या तापमानाचा पारा चढता असताना प्रचारात स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रचार करताना सोबत गार पाण्याची बाटली, आणि उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सोबत ओला रुमाल ठेवण्याचा मायेचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.



मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट प्रेरणादायी ठरली. मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास २० वर्षांनंतर राजसाहेब पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तसेच १७ मे च्या महायुतीच्या सभेत माननीय राजसाहेब सर्वांना मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील. - राहुल शेवाळे
Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.