मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league 2024) टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने दमदार कामगिरी केली. या हंगामातील पहिले शतकही याच फलंदाजाने केले. कमालीची बाब म्हणजे धमाकेदार फलंदाजी केल्यानंतरही या खेळाडूचा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावू शकते. केवळ १ सामन्यानंतर हे निश्चित होईल की रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरूचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.
२००८ पासून ते आतापर्यंत प्रत्येक वेळेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ इंडियन प्रीमियर लीग जिंकण्याचा दावेदार सांगितला जात आहे. कमालीची बाब म्हणजे संघात स्टार खेळाडूंनी भरलेला असतानाही संघाला एकदाही खिताब जिंकता आलेला नाही. मोठमोठ्या खेळाडूंची फौज असलेला संघ असतानाही त्यांना निराशा हाती आलेली आहे.
विराट कोहलीपासून अनेक मोठमोठे कर्णधार बंगळुरूला खिताब जिंकून देऊ शकलेले नाहीत. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातही आयपीएलमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.
या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत यातील केवळ एकच सामना त्यांना जिंकता आला. गेल्या पाच सामन्यांत विराट कोहलीला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत सगळ्यात खालच्या स्थानावर असलेल्या आपल्या संघाला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर पुढील सामना जिंकावाच लागेल. जर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हरला तर ते प्लेऑफच्या शर्यतूीतून बाहेर जातील.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…