Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीChardham Yatra: पहिल्यांदाच चारधामसाठी चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवा होणार सुरू

Chardham Yatra: पहिल्यांदाच चारधामसाठी चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवा होणार सुरू

चार दिवसांत १४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी केली नोंदणी विक्रम

उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये १० मेपासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेचा उत्साह यंदाही मोठ्या प्रमाणात दिसून गेल्या चार दिवसांत १४ लाखांहून जास्त लोकांनी नोंदणी केली. गेल्या चार महिन्यांत ५५ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. त्यात पहिल्यांदाच चारधामसाठी चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यात चार लोक एका धामची यात्रा साडेतीन लाख रुपयांत करू शकतील. चारधामसाठी हेलिकॉप्टर घेतल्यास प्रती व्यक्ती १.९५ लाख एवढे भाडे मोजावे लागेल. भाड्यात ये-जा, मुक्काम, भोजनाचा समावेश आहे. हेलिकॉप्टरही तेथेच राहील. एका दिवसात परतीचे भाडे १.०५ लाख असणार आहे, अशी माहिती उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.रविशंकर यांनी दिली.

केदारनाथपर्यंत सुपरफास्ट नेटवर्क केदारनाथच्या मार्गावर ४ जी व ५ जी नेटवर्क उपलब्ध असेल. त्यासाठी ४ टॉवर लावण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या मार्गावर काही ठिकाणी नेटवर्क असायचे. मंदिर परिसरात वायफायचा वापर करायचा झाल्यास सरकारी पावती काढावी लागायची. परंतु आता तेथे सुपरफास्ट नेटवर्क असेल. बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी योगेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन पूजा यंदा ३० जूनपर्यंतच होईल. त्यात श्रीमदभागवत वाचनासाठी ५१हजार रुपये तर महाभिषेकासाठी १२ हजार रुपये ठरले आहेत. सर्वात कमी देणगी २०१ रुपये कर्पूर आरतीसाठी आहे.

केदारनाथ हिम धाम

चारही धाम ३ हजार मीटरपेक्षाही उंच आहेत. डोंगरावर बर्फवृष्टी होत आहे. भाविकांनी ७ दिवसांचे नियोजन करूनच बाहेर पडावे.केदारनाथ धाममध्ये अद्यापही २ ते ३ फूट बर्फाचा थर आहे.गौरीकुंडापासून धामपर्यंत १६ किमीचा मार्ग बर्फाने आच्छादलेला आहे. १० मेपासून यात्रा सुरू होणार आहे. म्हणून एसडीआरएफने बर्फ हटवण्यास सुरुवात केली. उर्वरित तीन धामचे रस्ते खुले आहेत. हवामान विभाग केंद्राचे संचालक ब्रिकम सिंह म्हणाले, धाम भागातील बर्फवृष्टी मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल. १५ मेनंतरच हवामान सामान्य राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -