Air India: एअर इंडिया एक्सप्रेसची नवी मोहिम; मतदान करणाऱ्यांसाठी खुशखबर!

विमान तिकिटावर मिळणार विशेष सवलत


मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आजपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया एक्सप्रेसने मतदानाचा प्रचार करण्यासाठी नवीन मोहिम सुरु केली आहे. एअरलाइनकडून प्रथमच मतदारांसाठी तिकिटांवर विशेष सवलत मिळणार आहे. जे लोक पहिल्यांदा मतदान करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विमान तिकिटावर १९ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.


लोकांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने #VoteAsYouAre मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत, एअरलाइन्स प्रथमच मताधिकाराचा वापर करणाऱ्या १८ ते २२ वर्षे वयोगटातील तरुणांना विशेष सवलत देत आहे. मतदाराला संबंधित मतदारसंघाच्या जवळच्या विमानतळावर जाण्यासाठी ही सूट मिळेल. १८ एप्रिल ते १ जून २०२४ या कालावधीत ही सूट उपलब्ध असेल. सवलतीच्या तिकिटांचे बुकिंग एअरलाइनचे मोबाइल ॲप आणि वेबसाइट https://www.airindiaexpress.com द्वारे केले जाऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.


एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ अंकुर गर्ग म्हणतात की, एअर इंडिया एक्सप्रेसने नेहमीच समाजातील बदलासाठी काम केले आहे. कंपनी १९ व्या वर्धापन दिनाच्या तयारीत आहे. अशा वातावरणात कंपनीने आपला खास उपक्रम सुरू केला आहे.


ऑफरसाठी मतदार ओळखपत्र दाखवणे


एअर इंडिया एक्सप्रेसच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राउंड स्टाफला तुमचे मतदार ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेताना ग्राहकांना त्यांचे मतदार ओळखपत्र दाखवावे लागेल.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

शिक्षकांसह मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे शौर्यची आत्महत्या

शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत नवी दिल्ली (वृत्तसंस्था): प्राचार्या आणि

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती

शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल

नवी दिल्ली : बॉम्ब बनवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरली होती, असा कबुली जबाब फरिदाबादच्या

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी