मुंबई: कारले खाण्यासाठी कडू जरी लागत असले तर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते. कॅन्सरचा धोकाही कमी होतो. इतकंच नव्हे तर पोटाच्या समस्येचा धोकाही कमी होतो. याच कारणामुळे आरोग्य तज्ञ कारले खाण्याचा सल्ला देतात.
कारले भले खाताना कडू लागत असले तर याचे फायदे जबरदस्त आहेत. ही भाजी पाहून अनेकजण नाके मुरडतात. मात्र हे खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. कारल्यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. डायबिटीजच्या रुग्णांसाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही आहे.
हे खाल्ल्याने पाचनसंस्था चांगली राहते. शुगरच नव्हे तर बद्धकोष्ठता, हृदय, वेट लॉस आणि कोलेस्ट्रॉलमध्ये याचे बरेच फायदे होतात.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारले फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते डायबिटीजच्या रुग्णांनी याचा खाण्यात समावेश करावा. यातील गुण इन्सुलिन कंट्रोल करण्यास मदत करतात. यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.
कारले खाल्ल्याने रक्त साफ होण्यास मदत होते. रक्ताशी संबंधित गंभीर आजारांची जोखीम असते. कारल्यामध्ये अल्फा लिपोईक अॅसिड आढळते. यामुळे रक्तातील चरबी कमी करून धमन्यांचे आरोग्य चांगले राहते.
कारले खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पचनासारख्या समस्या दूर होतात. कारल्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
कारले कॅन्सरची जोखीम कमी करण्याचे काम करतात. याचा ज्यूस पिणे शरीरासाठी लाभदायक असते. कारल्यामध्ये फ्लॅवेनॉईड्स, गार्डेनिया आणि बीटा कॅरोटीनसारखे केमिकल कंपाऊंड कॅन्सर रोखण्यास मदत करतात.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…