मुंबई : राज्यासह देशात एकीकडे कडक ऊन पडत असल्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात काही भागात पाऊस धो धो कोसळला आहे. राज्यात काही पुढील तीन दिवस काही ठिकाणी धो धो पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पावसाने आज झोडपलं तर मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही भागात गारांचा पाऊस पडला. हवामान विभागाकडून अलर्ट जारी कऱण्यात आलाय. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा सल्लाही देण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. म्हणजे, दिवसा पाऊस कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी रात्रीचा उकाडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उकाडा वाढल्यामुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात हवामान नेमकं कसं असेल? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. २० एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. राज्यातील कोकण विभागात २० एप्रिल पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज डखांनी वर्तवला आहे.
राज्यात यंदा पाऊसकाळ अतिशय कमी झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळेच, सरकारनेही अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामध्ये, अवर्षणग्रस्त असलेल्या मराठावाड्यातील काही जिल्ह्यांचाही समावेश आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलाआहे. त्यातच, उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठीही पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, शासनाने आता चारा छावणीला सुरुवात केली असून मराठवाड्यातील पहिली चारा छावणी गंगापूरमधून सुरू करण्यात आली आहे.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडा पुन्हा एकदा चारा छावण्यांकडे वळाल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातली पहिली चारा छावणी गंगापूरमध्ये सुरू करण्यात आली. त्यामुळे, मराठवाड्याचा प्रवास पुन्हा टँकरवाडा ते चारा छावणी पर्यंत सुरू झाला आहे. छत्रपती संभाजी संभाजीनगर च्या गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने सुरू केली आहे.पहिल्याच दिवशी या चारा छावणीत ७०० जनावरांची नोंद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जनावरांना इथं मुबलक चारा पाणी देण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरच एक मोठं संकट कमी करण्यात बंब यांची मदत मोलाची आहे. एकीकडे राजकारणी प्रचारामध्ये व्यस्त असताना दुसरीकडे बंब यांनी सुरू केलेल्या चारा छावणीचा आदर्श सध्या इतरांनी घेण्याची ही गरज असल्याचं छावणीतील शेतकऱ्यांमधील चर्चेतून पुढे आले.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…