Ulajh Teaser Out: "लबाडी, फसवणूक आणि विश्वासघाताच्या जगात प्रवेश करा"

अभिनेत्री जान्हवी कपूरने केला आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज


मुंबई : ‘धडक’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर विविध भूमिका साकारताना दिसत आहे. जान्हवी कपूरची भूमिका असलेल्या आगामी 'उलझ' चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. ती आता एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुधांशू सारिया दिग्दर्शित या देशभक्तीपर थ्रिलरमध्ये जान्हवीसोबत गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू मुख्य भूमिका साकारत आहेत.


गेल्या वर्षभरापासून जान्हवी कपूर ‘उलझ’ चित्रपटाच्या चित्रीकरणासंदर्भात अपडेट देत होती. चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. आता तिच्या ‘उलझ’ चित्रपटाच्या टीझरसह प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.


‘उलझ’ या चित्रपटात जान्हवी कपूर भारतीय वन सेवा अधिकारीच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती साकारत असलेल्या आयएफएस सुहाना भूमिकेचा या मोहिमेतील हेतू सांगतानाच्या व्हाइस ओव्हरसह टीझरला सुरुवात होते. "गद्दारी की कीमत सिर्फ जान से चुकाई जा सकती है।" या 'उलझ' चित्रपटाच्या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये तिच्याबाबतीत अनेक थ्रिलर गोष्टी घडताना दिसतात. या चित्रपटात सुहाना देश आणि तिच्या विरोधात रचलेल्या कट उधळवताना पाहायला मिळणार आहे.


चित्रपटात गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तैलंग, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी यांच्याही भूमिका आहेत. तसेच टीझरमधील जान्हवीच्या अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत. "लबाडी, फसवणूक आणि विश्वासघाताच्या जगात प्रवेश करा" असे लिहून जान्हवीनं 'उलझ' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास!

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता व्ही. शांताराम यांच्या पत्नी, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री संध्या

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक