
मुंबई: देशभरात श्रीरामाचा जन्मोत्सव १७ एप्रिल २०२४ ला साजरी करत आहे. चैत्र नवरात्रीला नवमी तिथीला राजा दशरथ यांच्या घरी चार पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला होते. यावेळेस भगवान विष्णूने रामाचे रूपातील ७वा अवतार घेतला.
राम नवीच्या अभिजीत मुहूर्तामध्ये श्रीरामांचे पूजन केले पाहिजे. अयोध्येत यावेळेस सूर्य तिलक असणार आहे. राम नवमीच्या दिवशी आठ प्रहर उपवास करण्याची पद्धत आहे. म्हणजेच भक्तांना सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंत्या व्रताचे पालन केले पाहिजे. यामुळे शुभ फल प्राप्ती होते.
राम नवमी २०२४चा पुजा मुहूर्त
भगवान रामांनी कर्क लग्न दुपारी १२ वाजता जन्म घेतला होता. अशातच श्रीराम जन्मोत्सव अभिजित मुहूर्तामध्ये शुभ असते.
राम नवमी पुजेची वेळ - सकाळी ११.०३- दुपारी १.३८ वाजेपर्यंत
चैत्र शुक्ल नवमी तिथी सुरू - १६ एप्रिल २०२४, दुपारी १.२३
चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त - १७ एप्रिल २०२४ दुपारी ३.१४