Nashik Swine Flu: नाशिककरांना 'स्वाईनफ्लू' चा विळखा; एकाचा मृत्यू तर दोघांवर उपचार सुरू

नाशिक : गेल्या वर्षातील नाशिक शहरावरील डेंग्यूचे संकट टळले असतानाच आता वातावरणातील बदलामुळे शहरावर आणखी एका आजाराचे संकट ओढावल्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यावर 'स्वाइन फ्लू'ने (Swine Flu) डोकावले आले. शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे आरोग्य प्रशासन आता अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तापमान वाढले असल्यामुळे तापाचे रुग्ण वाढत असतानाच, आता स्वाइन फ्लूनेही शहरात दस्तक दिली आहे. सिन्नरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू तर शहरातील दोन जणांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र महिलेचा मृत्यू झाल्याने शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र विषाणूजन्य तापाची साथ सुरु असून त्यात आता स्वाईन फ्लूने भर घातल्याने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर दिसून येत आहे. आगामी काही दिवसात स्वाईन फ्लूने आपले पाय पसरु नये म्हणून जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. तसेच स्वाइन फ्लूचे लक्षणे आढळल्यास तत्काळ पालिकेच्या रुग्णालयांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



स्वाइन फ्लूचे लक्षणे आणि उपचार



  • सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या ही सामान्य लक्षणे दिसतात.

  • घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यासारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो.

  • गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणे

  • ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार, इत्यादी सह-विकृती असलेल्या रुग्णांना अधिक सावधगिरी बाळगावी.

  • H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला वेगळे म्हणजेच आयसोलेट केले पाहिजे आणि ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, घरी स्वत:च औषधे घेणे टाळावे.

Comments
Add Comment

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने

बिग बॉस हरुनही मराठमोळा प्रणित मोरे जिंकलाच,सलमान खानसोबत या सिनेमात झळकणार?

Bigg Boss 19 Pranit More मुंबई : बिग बॉस सीझन १९ चा ग्रँड फिनाले नुकसातच झाला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने

PMPML चा पुन्हा कहर; नऊ वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : शहरात अपघातांची मालिका सुरूच असून,एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.