Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीSrinagar News : श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटल्याने चार जणांचा मृत्यू

Srinagar News : श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटल्याने चार जणांचा मृत्यू

१० विद्यार्थ्यांसह अनेकजण बेपत्ता; बचावकार्य सुरु

श्रीनगर : जम्मू-काश्मीरची (Jammu Kashmir) राजधानी श्रीनगरमध्ये (Srinagar) बटवार येथील झेलम नदीत (Jhelum river) आज पहाटेच्या सुमारास बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या बोटीमध्ये १० ते १२ शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण प्रवास करत होते. या अपघातात काही जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, स्थानिक लोक, SDRF आणि इतर अधिकाऱ्यांनी त्वरीत बचावकार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन गंडबाल ते बटवारा, श्रीनगरला जाणारी एक बोट आज पहाटे मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बटवारा भागाजवळ झेलम नदीत उलटली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले आहे.

बटवाडा गंडाबल परिसरातील स्थानिकांनी सांगितले की, स्थानिक अल्पवयीन आणि इतर मुलांना घेऊन जाणारी बोट मंगळवारी सकाळी उलटली. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून इतरांना उपचारासाठी श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव कार्य सुरू करण्यात आले असून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेलमसह अनेक जलकुंभांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेच बोट उलटल्याची शक्यता आहे.

अनेक दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच आहे. त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पूंछ-राजौरी जिल्ह्यांना थेट काश्मीरशी जोडणाऱ्या मुघल रोडवर पुन्हा बर्फवृष्टी झाली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वरच्या भागात बर्फवृष्टी होत आहे, तर सखल भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्येही अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

पुन्हा अलर्ट जारी

या काळात उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असतो. आजही हवामान खात्याने वरच्या भागात हिमवृष्टीचा आणि खालच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २० एप्रिलपासून खोऱ्यात पुन्हा हवामानात बदल होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -