Udayanraje Bhosale : अखेर भाजपकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर!

नाशिकमुळे अडला होता साताऱ्याचा प्रश्न


सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातारा मतदारसंघातील (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा अखेरीस सुटला आहे. भाजपने या ठिकाणी आपला उमेदवार ठरवला आहे. आजच सातार्‍याच्या जागेवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Udayanraje Bhosale) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


साताऱ्यातून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होते. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. उदयनराजे दिल्ली भेटीनंतर राज्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष सुरु केला होता. मात्र, तरीही पुढील काही दिवस त्यांच्या नावाची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे एकप्रकारची धाकधूक त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.


महायुतीत साताऱ्याच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करत होता. एकीकडे, ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती, मात्र दुसरीकडे, राष्ट्रवादीचा दावा कायम होता. नाशिक लोकसभा मतदारसंघ देणार असाल तर साताऱ्याची जागा भाजपला सोडू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती.


नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही न सुटल्याने सातारा जागा देखील जाहीर झाली नव्हती. मात्र, भाजपने सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू, असा विचार करून उदयनराजे यांचे नाव जाहीर करण्याचे ठरवले होते. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव आहे.



नाव जाहीर झाले नसले तरी प्रचार कायम


दरम्यान, सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी नाव जाहीर होण्याची वाट न बघताच प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. त्यांनी दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केला व त्यांनतरही मतदारसंघात भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर उदयनराजे भोसले यांना भाजपकडून साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.



उदयनराजे विरुद्ध महाआघाडीचे शशिकांत शिंदे


उदयनराजे यांच्यासमोर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचे आव्हान असणार आहेत. त्यामुळे महायुतीचे उदयनराजे विरुद्ध महाआघाडीचे शशिकांत शिंदे अशी लढत साताऱ्यात पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द