Ashish Shelar : अग्गोबाईऽऽ ढग्गोबाईऽऽ लागली कळ, मातोश्रीच्या युवराजांची केवढी वळवळ!

आशिष शेलार यांची बालकवितेतून उबाठावर बोचरी टीका


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांना टोले लगावण्याची संधी राजकीय नेते (Political Leaders) सोडत नाहीत. त्यातच भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन (X Account) 'अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ 'नावाची एक बालकविता पोस्ट करत उबाठा गट (Thackeray Group) व विशेषतः आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) निशाणा साधला आहे.


आशिष शेलारांनी 'अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ' या कवितेत उबाठाच्या हिंदूद्वेषाचा उल्लेख केला आहे. याकुबच्या कबरीला साज चढवणाऱ्यांमध्ये हिंदूद्वेषाचा उद्रेक झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सतत गद्दार गद्दार म्हणत हे बालिश ढोल बडवत असतात, अशी टीकाही शेलारांनी केली आहे. या सगळ्यात आदित्य ठाकरे यांच्या दारुपार्ट्या चुकतायत, उरलेला गट हे भरलेल्या तलावाप्रमाणे दाखवतायत, असा टोलाही आशिष शेलारांनी कवितेच्या माध्यमातून लगावला आहे.


कवी संदीप खरे यांच्या 'अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ' या कवितेप्रमाणे ही कविता लिहिण्यात आली आहे. त्यामुळे आशिष शेलारांनी तळटीप लिहून संदीप खरे यांची क्षमा मागितली आहे. शेलारांची कविता वाचा जशीच्या तशी :


अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ,
मातोश्रीच्या युवराजांची केवढी वळवळ,
थोडी थोडी न थोडकी लागली फार,
याकूबच्या कबरीला साज आणि
हिंदू द्वेषाचा विखार...!


अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..!


शाखा शाखा गरागरा फिर फिर फिरे
गद्दार.. गद्दार.. बालिश ढोल बडवे
युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी
पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी!
बुडणाऱ्या बेडकांची या बडबड फार !
इवल्याशा गटाचा हा भरुन तलाव
साबु-बिबु नको..
थोडा मुंबईच्या मातीचा टिळा कपाळी लगाव!


अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ !




Comments
Add Comment

Hit-and-run : विले पार्ले हिट-अँड-रन; १९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची ₹५ हजारांच्या जामिनावर सुटका

मुंबई : विले पार्ले पश्चिम येथे १८ ऑगस्ट रोजी घडलेल्या कथित हिट-अँड-रन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय

Ashish Shelar : मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरा; पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश

तपासणी अधिकाऱ्यांची 89 पदे रिक्त https://prahaar.in/2026/08/24/why-are-jihadis-who-throw-eggs-at-the-ganesh-procession-even-needed-in-maharashtra-minister-nitesh-rane-asks-angrily/ मुंबई : मुंबई महापालिका

Pune MHADA Lottery 2026 : पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी; म्हाडाकडून ४,४६२ घरांसाठी सोडत जाहीर

पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने एक अत्यंत

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स