मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांना टोले लगावण्याची संधी राजकीय नेते (Political Leaders) सोडत नाहीत. त्यातच भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन (X Account) ‘अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ‘नावाची एक बालकविता पोस्ट करत उबाठा गट (Thackeray Group) व विशेषतः आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) निशाणा साधला आहे.
आशिष शेलारांनी ‘अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ‘ या कवितेत उबाठाच्या हिंदूद्वेषाचा उल्लेख केला आहे. याकुबच्या कबरीला साज चढवणाऱ्यांमध्ये हिंदूद्वेषाचा उद्रेक झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सतत गद्दार गद्दार म्हणत हे बालिश ढोल बडवत असतात, अशी टीकाही शेलारांनी केली आहे. या सगळ्यात आदित्य ठाकरे यांच्या दारुपार्ट्या चुकतायत, उरलेला गट हे भरलेल्या तलावाप्रमाणे दाखवतायत, असा टोलाही आशिष शेलारांनी कवितेच्या माध्यमातून लगावला आहे.
कवी संदीप खरे यांच्या ‘अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ‘ या कवितेप्रमाणे ही कविता लिहिण्यात आली आहे. त्यामुळे आशिष शेलारांनी तळटीप लिहून संदीप खरे यांची क्षमा मागितली आहे. शेलारांची कविता वाचा जशीच्या तशी :
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ,
मातोश्रीच्या युवराजांची केवढी वळवळ,
थोडी थोडी न थोडकी लागली फार,
याकूबच्या कबरीला साज आणि
हिंदू द्वेषाचा विखार…!
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..!
शाखा शाखा गरागरा फिर फिर फिरे
गद्दार.. गद्दार.. बालिश ढोल बडवे
युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी
पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी!
बुडणाऱ्या बेडकांची या बडबड फार !
इवल्याशा गटाचा हा भरुन तलाव
साबु-बिबु नको..
थोडा मुंबईच्या मातीचा टिळा कपाळी लगाव!
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ !
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…