Video: धोनीने पुन्हा दाखवले रौद्र रूप, ५००च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league) ज्या सामन्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो सामना रविवारी १४ एप्रिलला खेळवण्यात आला. चेन्नई सुपर किंग्ससमोर मुंबई इंडियन्सचा संघ खेळण्यासाठी उतरला होता.


हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरला. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईसमोर धावांचा डोंगर उभा केला. सलामीसाठी अजिंक्य रहाणेला पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरला. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडने पहिली विकेट पडल्यानंतर डाव सांभाळला.


४० बॉलमध्ये ५ चौकार आणि तितकेच षटकार ठोकत या स्टार क्रिकेटरने ६९ धावांची खेळी केली. शिवम दुबेने या सामन्यात ३८ बॉलवर नाबाद ६६ धावांची खेळी केली. अखेरीस महेंद्रसिंग धोनीने २० धावा करत स्कोर २०० पार पोहोचवला.


 


धोनीने ५०० च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा


चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानावर पाय ठेवला आणि ५००च्या स्ट्राईक रेटने धावांचे वादळ आणले. १९.२ षटकांत विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या माहीने ४ बॉलमध्ये ३ षटकार ठोकत २० धावा केल्या. हार्दिक पांड्या शेवटची ओव्हर करत होता आणि त्याने दुसऱ्या बॉलमध्ये डॅरेल मिचेलची विकेट मिळवली. यानंतर धोनी आला आणि त्याने सलग ३ षटकार ठोकत मुंबईच्या कर्णधाराची लाईन लेंथ बिघडवली.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना