Salman Khan : गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी दिला सलमान खानला दिलासा

फोनवरुन संपर्क साधत दिली सुरक्षेची हमी


पोलिसांचा तपास होईपर्यंत काही सांगता येणार नाही : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई : बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील (Mumbai) घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना आज पहाटे समोर आली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. तसेच सलमान सोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा देखील केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सलमान खानला सुरक्षे संदर्भात दिलासा दिला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली असल्याची देखील माहिती मिळत आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेवर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांचा तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय

मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार

महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत.

मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या

मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुंबईतील राजाबाई टॉवर, ग्रंथालय इमारत, वस्तुसंग्रहालयाचे संवर्धन मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व