फोनवरुन संपर्क साधत दिली सुरक्षेची हमी
पोलिसांचा तपास होईपर्यंत काही सांगता येणार नाही : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील (Mumbai) घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना आज पहाटे समोर आली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. तसेच सलमान सोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा देखील केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सलमान खानला सुरक्षे संदर्भात दिलासा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली असल्याची देखील माहिती मिळत आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेवर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांचा तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.