आज प्रसिद्ध होणार भाजपाचे संकल्पपत्र!

नवी दिल्ली : देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. दरम्यान, भाजपाचा जाहीरनामा रविवारी (१४ एप्रिल) प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आपल्या दिल्लीतील मुख्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. यावेळी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे.


यंदा भाजपाच्या संकल्प पत्रात कोणती आश्वासने दिली जातात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आधीच निवडणूक आश्वासने देणाऱ्या पक्षाच्या जाहीरनाम्यावर इंडिया आघाडीसह अन्य विरोधी पक्षही लक्ष ठेवून आहेत. हा जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपाने २७ सदस्यीय समिती स्थापन केली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत होती. भाजपाने 'संकल्प पत्रा'बाबत लोकांकडून सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, दीड लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून पक्षाला आपल्या सूचना दिल्या आहेत. नमो ॲपच्या माध्यमातून ४० हजारांहून अधिक सूचनाही मिळाल्या आहेत. संकल्प पत्राशी संबंधित एकूण ५ लाख सूचना पक्षाकडे आल्याचे सांगण्यात आले.


संकल्प पत्र तयार करण्यासाठी बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या असून, त्यात आगामी निवडणुकीत जनतेला कोणत्या गोष्टींचे आश्वासन द्यायचे आहे, हे ठरविण्यात आले. तसेच, भाजपाच्या संकल्प पत्राची थीम 'मोदींची गॅरंटी: विकसित भारत २०४७' असू शकते. याशिवाय, यामध्ये देशाला विकसित बनवण्यासाठी अनेक घोषणा केल्या जातील. महिला आणि गरीबांवरही लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. दरम्यान, संकल्प पत्राच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील म्हैसूर येथे जाहीर सभेसाठी आणि बंगळुरूमध्ये रोड शोसाठी रवाना होतील. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले सर्वाधिक लक्ष दक्षिण भारतावर केंद्रित केले आहे.



काँग्रेसचे 'न्याय पत्र' आधीच प्रसिद्ध


लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान करण्यासाठी आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे एक एक करून सर्व पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. काँग्रेसने 'न्याय पत्र' या नावाने आपला जाहीरनामा यापूर्वीच प्रसिद्ध केला आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या निवडणूक आश्वासनांनी भरलेल्या 'संकल्प पत्रा'ची आता सर्वजण वाट पाहत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी, अग्निवीर योजना मागे घेणे आणि जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणे अशी आश्वासने देण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे