Arun Govil: छोट्या पडद्यावर गाजवली रामाची भूमिका; पण राजकारणी झाल्यानंतर अभिनयाला रामराम!

कोण आहे 'हा' अभिनेता?


मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळत आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री आता राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच प्रभू राम म्हणून ओळखले जाणारे अरुण गोविल (Arun Govil) यांचाही समावेश आहे. छोट्या पडद्यावरील 'रामायण' (Ramayana) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अरुण गोविल घराघरांत पोहोचले. श्री रामाची भूमिका साकारुन त्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.


अभिनयक्षेत्र गाजवल्यानंतर अरुण गोविल आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) भाजपाने (BJP) अरुण गोविल यांना उतरवलं आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात अरुण गोविल राजा दशरथ या भूमिकेत दिसणार आहेत. तर रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसेल. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अरुण गोविल अभिनयक्षेत्राला रामराम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


अरुण गोविल आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल खूप उत्साही आहेत. नुकतेच त्यांनी अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडल्याचे उघडपणे सांगितले आहे. 'अभिनयक्षेत्रापासून वेगळ्या असलेल्या माझ्या कारकिर्दीची ही एक नवीन इनिंग आहे आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे. आता हा नवा प्रवास कसा असेल याची मलाही उत्सुकता आहे' असे अरुण गोविल यांनी सांगितले. तसेच अरुण गोविल पुढे म्हणाले की,"याआधीदेखील मला राजकीय पक्षांकडून निवडणुकीला उभं राहण्याची विचारणा झाली आहे. पण त्यावेळी राजकारणात येण्याचा मी काहीही विचार केला नव्हता. राजकारणाचा प्रवास कसा होतोय यावर पुढची गणितं अवलंबून असतील. सध्या मी यावर उघडपणे काहीही बोलू इच्छित नाही. सध्यातरी माझं संपूर्ण लक्ष आगामी निवडणुकांवर आहे"असे अरुण गोविल यांनी सांगितले.


'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील अरुण गोविल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना हे फोटो पाहता आले नव्हते. अरुण गोविल सध्या त्यांच्या 'रामायण' चित्रपटाचं शूटिंग करत आहेत.


Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात १२ आरोपींचा सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२

जयपूर-अजमेर महामार्गावर २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट

केमिकल टँकर आणि लीपीजी ट्रकमध्ये धडक, एकाचा मृत्यू जयपूर (वृत्तसंस्था) : मंगळवारी रात्री १० वाजता जयपूर-अजमेर

टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा नियमावलीच्या छताखाली

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ॲप आधारित वाहतूक सेवेबाबतचे धोरण येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार असून या