Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणCongress : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के! राजापूरमधील कुणबी समाजाचे नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

Congress : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के! राजापूरमधील कुणबी समाजाचे नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार पक्षप्रवेश

राजापूर : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ येत असतानाच काँग्रेसला (Congress) धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मनासारखे जागावाटप न झाल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच नाराजीचा सूर मारला आहे. त्यातच अनेक बड्या बड्या नेत्यांनी यापूर्वी काँग्रेसची साथ सोडली आहे. काँग्रेसला लागलेली ही गळती अजूनही सुरुच असून आता राजापूरमध्येही (Rajapur) काँग्रेसला एक मोठा धक्का बसणार आहे. राजापूरमधील कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर (Prakash Mandavkar) हे पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजप नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश मांडवकर यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. रत्नागिरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये प्रकाश मांडवकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मांडवकरांकडे राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. मागच्या ३२ वर्षांपासून ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये काम करत आहेत.

कुणबी समाजाचे दिवंगत नेते भाईसाहेब हातणकर यांचे प्रकाश मांडवकर हे खंदे समर्थक राहिलेले आहेत. याशिवाय त्यांनी काही काळ त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी कुणबी समाजासाठी तालुक्यामध्ये मोठं काम उभं केलं. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद कमी होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -