Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीRajnath Singh: काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होणार!

Rajnath Singh: काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होणार!

राजनाथ सिंह यांचा काँग्रेसवर घणाघात

डेहराडून : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचारादरम्यान एका सभेला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी काँग्रेस (Congress) पक्षावर घणाघात केला. उत्तराखंड येथील गढवाल लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अनिल बलूनी यांच्या समर्थनार्थ एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या काही वर्षांनंतर लहान मुलंसुद्धा काँग्रेस पक्षाला ओळखणार नाहीत असे म्हणत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.

लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अशातच मागील काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. पक्ष सोडून गेलेले नेते एनडीएमध्ये सहभागी होत आहेत. या नेत्यांमध्ये मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये दाखल झाले. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. तर मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये सहभागी झाले आहेत.

काँग्रेसमधून नेते पळून जात आहेत. एकानंतर एक पक्ष सोडत आहेत. बाहेर पडलेले नेते भाजपा किंवा एनडीएमधील घटकपक्षांमध्ये सहभागी होत आहेत. मला भीती आहे की, पुढच्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होऊन जाईल. काँग्रेस नेते रोज एक-दुसऱ्याशी लढत आहेत. टीव्ही शो बिग बॉसप्रमाणे ते एकमेकांचे कपडे फाडत आहेत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर सभेत म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -