मुंबई: वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा असतात ज्या एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कधीही वापरू नयेत. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या गोष्टी इतरांच्या वापरत असाल तर तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.
वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुमची वाईट वेळ सुरू होऊ शकते.
चुकूनही दुसऱ्याचे घड्याळ आपण वापरू नये. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही.
अनेकजण दुसऱ्याचे घड्याळ वापरतात मात्र असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनात संकट येऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार इतर कोणाचाही रूमाल वापरू नये. दुसऱ्या व्यक्तीचा रूमाल आपण वापरल्याने त्या व्यक्तीसोबतच्या नात्यात अडथळा येऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार कधीही दुसऱ्या व्यक्तीचे कपडे मागून घालू नयेत. दुसऱ्याचे कपडे घातल्याने नकारात्मक उर्जा तुमच्या शरीरात येऊ शकते. यामुळे समस्यांमध्ये तुम्ही अडकू शकता.