Ashish Shelar: काय झाडी... काय डोंगर... एकदम सगळं कसं ओके... काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!

भाजपा नेते आशिष शेलार यांचा कवितेच्या माध्यमातून खोचक टोला


मुंबई : लोकसभा निवडणुकांना सुरुवात होताच भाजपा नेते अनंतकुमार हेगडे यांनी ४०० पार बहुमत आले की, संविधान बदलणार असे जाहीरपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागाराने संविधान बदलले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शोभत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र नाना पटोले यांच्या टिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.


"काय झाडी... काय डोंगर... एकदम सगळं कसं ओके... काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके !" असं म्हणत आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काय झाडी..! काय डोंगर...!! महायुतीमध्ये एकदम ओके..! आघाडीत एकमेकांना एकमेकांचेच धोके ! वर्षानुवर्षे काँग्रेसला काँग्रेसनेच हरवलं, त्यातच आता उबाठा गटाला घ्यायचं ठरवलं. या गटाच्या मैत्रीला तर दुष्मनाची ही नाही येणार सर, ऐक काँग्रेस, आता तू कर्माने मर!"


"साहेबांच्या गटाची तर काय सांगावी ख्याती? गावभर भांडणं लागली की, साहेब म्हणणार आपली ताई आणि आपली बारामती!! काय झाडी... काय डोंगार... एकदम सगळं कसं ओके... काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके !" असे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.





Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या

दसरा मेळाव्यासाठी मुंबई मनपाकडून ठाकरे गटाला परवानगी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी

गणेशोत्सव काळात एसटीला बाप्पा पावला

१ कोटी ८० लाखांचे उत्पन्न; ३१,५४६ प्रवाशांचा प्रवास पालघर(प्रतिनिधी) : पालघर एसटी विभागाच्या माध्यमातून

‘ओसी’ नसलेल्या इमारतीसुद्धा रडारवर

बांधकाम परवानग्यांचे संकलन सुरू विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार पालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती उभ्या करून,