पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची ताकद वाढली असून त्यांच्या मताधिक्क्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी ठाकरे यांनी हा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
पुण्यामध्ये मनसेचे चांगले काम आहे. मनसेचाही एक मोठा मतदार वर्ग पुण्यात आहे. मनसेला नुकताच रामराम ठोकलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांचा पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर रोष आहे. त्यांनी एकतर्फी निवडणूक कशी होते, ते बघतो असे आव्हान दिले आहे. मात्र, आता मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने मोरे यांच्या विरोधातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणखी जोमाने काम करतील. या सर्व गोष्टींचा आपसूकच फायदा मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढण्यात होणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेला बिनशर्त पाठिंबा, हा देशाच्या विकासाबद्दल असलेला त्यांचा सच्चेपणा अधोरेखित करतो. हिंदू नववर्षाच्या शुभदिनी केलेल्या या घोषणेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना निश्तिच बळ मिळाले आहे. पुणे लोकसभा निडणुकीतही मनसैनिकांना सोबत घेऊन आम्ही एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा विश्वास वाटतो”.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…