Chandrashekhar Bawankule: मविआचे सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होते?

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला


मुंबई : मविआचे सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होते? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला १०० कोटींची वसुलीची सुरूवात कोणी केली होती?,' असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेससोबत राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे.


महाविकास आघाडीने मंगळवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.


उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्याचसोबत त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली. ‘यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार.', असे मत त्यांनी व्यक्त केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'महाभ्रष्टाचारी आघाडीने ज्यांच्या नेतृत्वात अडीच वर्षे राज्याला लुटले ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जी टीका करत आहेत. हा एक मोठा विनोद आहे,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.



४ जूननंतर घरात बसून राहण्याचे काम करावे लागेल


‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केले. तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामाही उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकवणार आहे. ४ जूननंतर उबाठांना घरात बसूनच राहावे लागणार’ असल्याचे बावनकुळे यांनी सांंगितले.

Comments
Add Comment

महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर उद्या सुनावणी

बालगंधर्व रंगमंदिर सज्ज पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग

नेव्ही नगरमध्ये सुरक्षारक्षकाच्या हातावर तुरी देत अज्ञात व्यक्ती रायफल व काडतुसे घेऊन फरार !

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नौदलाच्या प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी एक मोठी घटना घडली.

पुणे मेट्रोचे गणेशोत्सवात साडेपाच कोटींचे उत्पन्न

पुणे : मानाच्या प्रमुख बाप्पांचे दर्शन, देखावे आणि विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या

घरबसल्या मिळणार रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती

नागरिकांसाठी https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष लिंकवर रस्‍ते कामांची माहिती उपलब्‍ध मुंबई : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा

सुपरस्टार अक्षय कुमारची संपत्ती किती ?

मुंबई : बॉलीवूड हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे मेहनत, चिकाटी आणि अभिनयाच्या जोरावर सामान्य माणूसही सुपरस्टार बनू