मालेगांव : भारतात जर मुस्लिमांचे राज्य होते तर नद्यांची नावे गंगा, ब्रह्मपुत्रा व भीमा का? असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. त्यामुळे भारतात फक्त हिंदूंचेच राज्य होते याचे उत्तर मिळते. परंतु याला अपवाद ठरला आहे. ती म्हणजे मालेगावातील मोसम नदी. वास्तविक पाहता या नदीचे नाव मोसम नसून मोक्ष गंगा नदी आहे. असे इतिहास तज्ञांचे म्हणणे असून त्याचे गुपित आता बाहेर पडताना दिसत आहे.
मोक्षगंगा नदीचा इतिहास सांगणारे सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे यापुढे ज्याप्रमाणे गावांचे नाव बदलत आहे. त्याचप्रमाणे आता मोसम नदीचे नाव मोक्षगंगा नदी व्हावे अशी मागणी मालेगाव येथील सुप्रसिद्ध वकील ऍडव्होकेट शिशिर हिरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदना मार्फत केली आहे.
या मागणीला सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मागणी देखील होऊ लागली आहे. आणि त्यात काही वावगे नाही. यावेळी मालेगाव येथील सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते व यावेळी अॅडव्होकेट परिक्षीत पवार, गोपाल गावडे, संदीप हिरे व इतर हिंदुत्वादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्व भूमिकेवर प्रशासन काय भूमिका घेते हेच बघायचे ठरेल, तसेच यावेळी अॅडव्होकेट शिशिर हिरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे ते यावेळी बोलत होते.
जर प्रशासनाने लवकर दखल न घेतल्यास न्यायालयीन मार्गाने देखील लढा देण्यात येईल असे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे भूमिका मांडली.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…