नागपूर : समृद्धी महामार्ग नेहमी अपघात होत असल्याचे समोर आलं आहे. या महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबत नसून आज पुन्हा एक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. (Accident On Samruddhi Highway)
समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर हडस पिपंळगाव जवळील (Chhatrapati Sambhajinagar) टोल नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. घटनास्थळी मदत कार्यासाठी नागरिक धावून आले होते.
समृद्धी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातामुळे सुविधा आणि सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसेच अपघाताच्या घटना थांबाव्या म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.