Morning Foods: सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी खाण्यासाठी बेस्ट आहेत हे पदार्थ

  77

मुंबई: जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही रिकाम्या पोटी योग्य पदार्थांचे सेवन केले तर यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात केवळ उत्साहवर्धकच होणार नाही तर पचनसंस्थेतही सुधारणा होईल. जाणून घ्या कोणते पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाणे असते बेस्ट...



रात्रभर भिजवलेले बदाम


बदामामध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन आणि मोठ्या प्रमाणात फायबर असतात. ते रात्रभर भिजवल्याने हे एन्झाईम रिलीज करण्यास मदत करतात तसेच पाचन आणि पोषकतत्वांचे शोषण करतात.



ग्रीक योगर्ट


ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात जे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. अधिक चवीसाठी तुम्ही यात फळे अथवा मध घालू शकता.



चिया सीड्स


चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. पाण्यात भिजवल्याने हे जेलप्रमाणे होतात.



पपई


पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे पचनासाठी मदत करते. तसेच अपचनाचा त्रास दूर करते. रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास पाचनक्षमता सुधारते.



पालक


पालकामध्ये आर्यन, व्हिटामिन आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. रिकाम्या पोटी यांचे सेवन केल्याने याचे फायदे दुपटीने वाढतात.

Comments
Add Comment

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.

Health: प्रोटीनचा उत्तम स्रोत! 'या' ५ ड्रायफ्रूट्समुळे मिळेल भरपूर प्रोटीन

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रोटीन

Sleep: शांत झोप हवी आहे? 'या' ५ फळांमुळे मिळेल गाढ झोप!

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात चांगली आणि पुरेशी झोप मिळवणं अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. अपुरी झोप अनेक

शाकाहारी लोकांसाठी 'ड' जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे पदार्थ

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्व (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरातील हाडांची मजबुती,

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

उकडीचे मोदक

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो, पण जरा हटके वाटेल असे सुंदर