महाड( प्रतिनिधी) – महाड तालुक्यातील कोथेरी वडाचा कोंड येथे राहणाऱ्या दगडू शिंदे यांच्या घराला आज सकाळी १० वाजण्याचे सुमारास अचानक आग लागल्याने घरातील रोकड, सामानसुमान कपडे असे सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी तातडीने पाण्याचा मारा केल्याने महाड नगर परिषदेचा अग्नीशामक दल येण्यापुर्वी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
महाड तालुक्यातील कोथेरी वडाचा कोंड येथे राहणारे दगडू शिंदे हे कामानिमित्त मुंबई येथे आहेत त्यांचा मुलगा व मुलगी महाड शहरात सकाळी आपल्या कामावर निघून गेले तर त्यांची आई ही रानात गेली होती. सकाळी १० वाजण्याचे सुमारास घरात कोणीही नसताना अचानक आग लागली. शिंदे यांचे घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येई पर्यत घरातील कपाटे, फर्निचर, भाताचे भरून ठेवलेले ड्रम यांनी पेट घेतला होता.
स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्नाने ही आग विझवण्यात यश मिळवले. मात्र घरातील कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड आणि फर्निचर सामानसुमान कपडे असे एकुण अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…