Gourav Vallabh : शाळेत असताना कधी मॉनिटरची निवडणूकही लढवली नाही तो व्यक्ती काँग्रेस पक्ष चालवतोय!

काँग्रेसच्या विचारसरणीत नाही, तर फक्त राज्यसभेची जागा राखण्यात रस


नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गौरव वल्लभ यांचा काँग्रेसच्या जयराम रमेश यांच्यावर हल्लाबोल


मुंबई : काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांनी तीन दिवसांपूर्वीच भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला. 'मी सनातनी विरोधी घोषणा देऊ शकत नाही', असा जोरदार हल्लाबोल करत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. यानंतर त्यांनी आज काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश (Jairam Ramesh) यांच्यावर आपले टीकास्त्र उपसले. 'काँग्रेस पक्षाचा ग्राऊंड लेवल कनेक्ट पूर्णपणे तुटला आहे. ज्या व्यक्तीने शाळेत असताना कधी मॉनिटरची निवडणूक लढवली नसेल तो व्यक्ती काँग्रेस पक्ष चालवतोय', अशी त्यांनी टीका केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गौरव वल्लभ यांनी जयराम रमेश यांची कार्यपद्धती कशी चुकीची आहे, याचा पाढाच वाचला.


गौरव वल्लभ म्हणाले, "मी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा पक्षाचे ४२ खासदार होते. नवीन विचारांना प्रोत्साहन मिळेल या विचाराने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र असे काहीही झाले नाही. गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसचा जाहीरनामा एकच आहे. एक व्यक्ती तो तयार करत आहे, जर त्या व्यक्तीचे विचार ठाम असते तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती.


पुढे ते म्हणाले की, "अर्थसंकल्पानंतर आपल्याला पत्रकार परिषद घेण्यास सांगितले होते. परंतु आपण तसे करण्यास नकार दिला आणि जोपर्यंत काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व अयोध्येतील राम मंदिराला भेट देत नाही, तोपर्यंत पत्रकार परिषद घेणार नसल्याचे सांगितले."



माजी मंत्र्यांचे पीए पक्षाची धुरा सांभाळत आहेत


माजी केंद्रीय मंत्र्यांचे पीए आता काँग्रेस पक्ष सांभाळत असल्याची टीका गौरव वल्लभ यांनी केली. ते म्हणाले की, त्या पीएला निवडणूक कशी लढवायची हे माहित नाही. उत्तर प्रदेश आणि बिहार ही वेगवेगळी राज्ये आहेत हे त्यांना कदाचित माहीत नसेल. असे काही त्यांना विचारले तर ते गोंधळून जातील. जर तुम्ही त्यांना जालोरे, सरोही कुठे आहेत असे विचारले तर ते कदाचित मध्य प्रदेश म्हणतील. हे त्यांचे ज्ञान आहे. अशा नेत्यांचे ग्राउंड कनेक्शन खूपच कमकुवत आहे.



त्या व्यक्तीला आपली राज्यसभेची जागा वाचवण्यात रस


गौरव वल्लभ हे जयराम रमेश यांच्यावर टीका करताना म्हणाले की, “मी कॉलेजमध्ये असताना ती व्यक्ती काही वर्षांपूर्वी काँग्रेसची प्रवक्ता होती. आता ती संपर्क कक्षाची प्रमुख आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारसरणीत रस नाही. त्यांना फक्त त्यांची राज्यसभेची जागा राखण्यात रस आहे."

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदल मुंबई  : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा –

मुंबई मेट्रो - ११ च्या प्रकल्पाच्या नवीन मार्गाची प्रक्रिया सुरू

मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल)

राज्यात ५,८६६ कोटी रुपये बँकांमध्ये बेवारस

मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी