Devendra Fadnavis : भाजपा हा एकमेव पक्ष ज्यात आतापर्यंत कधीही फूट पडली नाही!

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार


नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या (Bhartiya Janata Party) स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) स्वपक्षाचं कौतुक करतानाच विरोधी पक्षांवर टीका केली. तसेच, इतर पक्ष फुटण्यामागे स्वार्थी, आत्मकेंद्री नेते असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपा आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. जगात सर्वाधिक सदस्य भाजपाचे आहेत. भारतात सर्वाधिक खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य, महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य भाजपाचे आहेत.”


पुढे ते म्हणाले, “देशाच्या इतिहासात एकच असा राष्ट्रीय पक्ष आहे ज्यात कधीच उभी फूट पडली नाही. देशातल्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या आता मोजता येणार नाहीत. कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. समाजवादी पक्षाची तर एवढी शकलं पडली की मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल. पण भाजपा एकमेव असा पक्ष आहे की पहिल्यापासून आजपर्यंत या पक्षात कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंघ राहिला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.



भाजपाचे नेते आत्मकेंद्री आणि स्वार्थी नाहीत


यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पक्षात फूट न पडण्यामागचं कारण सांगितलं. “भारतीय जनता पक्षात फूट पडली नाही याचं एकमेव कारण म्हणजे या पक्षाचे नेते कधी आत्मकेंद्री नव्हते. ते कधी स्वार्थी नव्हते. या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते. हा पक्ष कुणालातरी पंतप्रधान बनवण्यासाठी, कुणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी, कुणालातरी सत्तेची खुर्ची देण्यासाठी तयार करण्यात आलेला नाही. एका विचारासाठी हा पक्ष तयार करण्यात आला,” असं ते म्हणाले.



जयंत पाटलांना टोला


देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानावरून टोलाही लगावला. “बारामतीमध्ये काही गोष्टींचा ठरवून प्रचार केला जातोय”, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “ते त्यांच्या पक्षात नाराज आहेत. त्यांच्या पक्षात त्यांना कुणी विचारत नाहीत. त्यामुळेच ते अलिकडच्या काळात अशी वक्तव्य करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारच दिसतायत. एवढी मोठी निवडणूक चालू आहे, पण जयंत पाटील कुठेही दिसत नाहीयेत”.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन