काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यूयॉर्क, थायलंडचे फोटो

भाजपाचा आरोप


नवी दिल्ली : काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात न्यूयॉर्क आणि थायलंड देशातील फोटो छापण्यात आले आहेत, यावरून काँग्रेस किती गंभीर आहे, हे दिसून येते, असा आरोप भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे.


भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, “मध्यंतरी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख म्हणाल्या की, त्यांचे सोशल मीडिया कोण हाताळते? हे त्यांना माहीत नाही. पण पक्षाचा जाहीरनामा कोण तयार करते, हे तरी पक्षाला माहीत नसावे. जाहीरनाम्यात पर्यावरण विभागात जे फोटो छापले गेले आहेत, ते राहुल गांधींच्या आवडत्या देशाचे आहे. थायलंड हा देश राहुल गांधींचा आवडता देश आहे.”


“काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, काँग्रेसला जेव्हा स्वातंत्र्यानंतर सत्ता मिळाली होती, तेव्हा देशात सुईचेही उत्पादन होत नव्हते. पण त्यांचे विधान असत्य आहे. सी व्ही रामण यांना १९३० साली नोबल पारितोषिक मिळाले होते. भारतीय विज्ञान संस्थेची (बंगळुरू) १९०९ साली स्थापन करण्यात आली होती. पण तरी नेहरूंच्या आगमनानंतरच देशात सर्व काही सुधारणा झाली, असे काँग्रेसचे म्हणणे आहे”, असाही आरोप त्रिवेदी यांनी केला.


त्रिवेदी पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात चुकीचे फोटो वापरले गेले, हा मोठा विषय नाही. पण ते फोटो विदेशातले आहेत, हा चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत काँग्रेस नेते विदेशात जाऊन भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करत होते. पण आता तर ते विदेशातले फोटो आणि त्यांचा जाहीरनामाच उचलत आहेत. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी स्वतःच्या शासन काळात कधीच पूर्ण केलेली नाहीत. मग त्यांचे सरकार केंद्रात असो किंवा कोणत्याही राज्यात असो…, अशीही टीका त्रिवेदी यांनी केली.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे