Chandu Champion: 'या'साठी अभिनेता कार्तिक आर्यन गिरवतोय मराठीचे धडे

१४ महिन्यांची कठोर मेहनत


मुंबई : साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेला आगामी 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) हा यंदा प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाद्वारे विलक्षण कथा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. तसेच चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) नव्या अवतारात दिसणार आहे. त्याने या आगामी चित्रपटासाठी कंबर कसली आहे.


चंदू चॅम्पियन चित्रपटातील भूमिका हूबेहूब साकारण्यासाठी कार्तिक आर्यन अथक परिश्रम करत आहे. चित्रपटातील मराठी संवाद बोलण्यासाठी आणि बोली भाषा शिकण्यासाठी त्याने १४ महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे. कार्तिकने चित्रपटासाठी १४ महिने मराठी बोलीवर लक्ष केंद्रित केलं होतं. मराठीवर प्रभुत्व असलेल्या एका शिक्षकाने त्याला भाषेवर चांगली पकड मिळवण्यास मदत केली. तसेच कार्तिकने चित्रपटाकरीता शारीरिकदृष्ट्या व व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीनेही कठोर मेहनत घेतली आहे.


चंदू चॅम्पियन चित्रपट येत्या १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपटातील कार्तिकने घेतलेली मेहनत व मराठी भाषासंपदा पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालली आहे.

Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट